Breaking News

विद्यार्थ्यांनी वसंतराव अण्णा सारखे नावलौकिक वाढवून आदर्श जीवन जगा.. -प्रा. जयवंत आवटे..! कै. वसंतराव पाटील स्मृती समारोह व श्रीधर कन्या प्रशाला पारितोषक समारंभ संपन्न...


 नाझरे प्रतिनिधी 

      कै. वसंतराव पाटील यांनी शेतकऱ्यांबरोबर व विद्यार्थ्‍याबरोबर काम करून एक चळवळीतील नेते म्हणून नावलौकिक वाढविले व त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी जन्म तारखे वर व हेळव्याकडे नुसते नाव ठेवून न जगता वसंतराव अण्णा सारखे नावलौकिक वाढवून आदर्श जीवन जगा व नाझरे गाव गुंडांचे करण्यापेक्षा  अधिकार्‍याचे करा असे ग्रामीण विनोदी कथाकार जयवंत आवटे यांनी कै. वसंतराव पाटील अण्णा स्मृती समारोह व श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेज पारितोषिक वितरण समारंभात नाझरे ता. सांगोला येथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे होते. 


    सुरुवातीस कै. वसंतराव अण्णा यांच्या समाधीचे दर्शन, त्यानंतर दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन तसेच स्वागत गीत म्हणण्यात आले. प्रास्ताविक शिक्षक शिवभूषण ढोबळे यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय स्नेहसंमेलन प्रमुख दुर्योधन आलदर यांनी करून दिला. यावेळी अण्णांच्या कार्याची महती फार मोठी आहे व त्याची उणीव सातत्याने जाणवत आहे असे मत डॉ. अनिकेत देशमुख यांनी व्यक्त केले. सदर प्रसंगी मा. जि प सदस्य दादाशेठ बाबर, मा. उपसभापती सुनील चौगुले, डॉ. शिवाजीराव ढोबळे, संस्थेच्या संचालिका सौ. सीता देवी चौगुले, सहसचिव मुकुंद पाटील, मा. सरपंच दिपाली देशमुख, शामराव वाघमारे, संजय सरगर, पुरुषोत्तम सूर्यवंशी, शिक्षक नेते अशोक पाटील, सुनील बनसोडे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सरगर, 


युवा नेते राजेंद्र बंडगर, चंद्रकांत बंडगर, विनायक बंडगर, सुरेश पाटील, आनंदा कोकरे, सचिन कोकरे, मधुकर आलदर, हनुमंत होनमाने, बाळासो चौगुले, किशोर बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, दर्याबा बंडगर, बाळासो चौगुले, बिरा बंडगर, चेअरमन अनिल बंडगर, व्हॉइस चेअरमन गोरख भाऊ आदाटे, राजाराम कोळेकर, अरुण रायचुरे, सौरभ पाटील, लक्ष्मण ढोबळे, राजू गडहिरे, पत्रकार रविराज शेटे, सुनील जवंजाळ, राजेंद्र चौगुले, आनंदा सोनार, शिवाय स्वामी सर, धोकटे सर, संतोष रायचुरे, अरुण चव्हाण, हुसेन शेख, मा. प्राचार्य प्रकाश परिचारक, प्राचार्या यास्मिन मुल्ला, मुख्याध्यापक बापूसोकाटे, शिक्षिका नयन जोंधळे, सेवानिवृत्त शिक्षक शहाजान मुलांनी, बाबर सर, समीर मुलांनी, सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विजय गोडसे तर आभार प्रा. नवनाथ बंडगर यांनी मानले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

    अण्णांचे नेतृत्व व कर्तुत्व मोठे

       वसंतराव अण्णा यांचे नेतृत्व व कर्तुत्व मोठे होते. विद्यार्थ्यांनी अण्णांचा व आबासाहेबांचा विचार टिकवावा...

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत