Breaking News

कर्णकर्कश सायलेन्सरवर मंगळवेढा पोलिसांचा दणका : १२ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई..


 विशेष प्रतिनिधी : येताळा खरबडे

दि. २१ डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवेढा शहरात काही बेजबाबदार दुचाकीस्वारांनी कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करून हुल्लडबाजी करत शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. बुलेट, यामाहा, सुझुकी ई. अशा मोटरसायकलवर मॉडीफाईड सायलेन्सर लावून मोठ्या आवाजात गाड्या चालवून नागरिकांना त्रास दिला जात होता.

या प्रकाराची गंभीर दखल घेत मंगळवेढा उपविभागाचे डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे सो. व पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय बोरीगिड्डे सो. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीष जोग, पोसई विजय पिसे, पोसई नागेश बनकर तसेच वाहतूक विभागाचे पोहेकॉ/१४२१ संभाजी यादव, पोकॉ/१०६८ सुरज साळुंखे, पोहेकॉ/ ४०८ तुकाराम कोळी , पोहेकॉ/ १६२१ श्रीमंत पवार, पोहेकॉ/१६०३ गोरख कांबळे, पोकॉ/१२५८ चंद्रकांत सुतार, पोकॉ/१२२७ प्रेम दिवसे  मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत १२ मोटरसायकलस्वारांना ताब्यात घेतले.

सदर दुचाकीस्वारांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, संबंधित मोटरसायकलींचे मॉडीफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. यावेळी सपोनि गिरीष जोग यांनी संबंधितांना कडक शब्दांत समज देत, यापुढे अशा प्रकारची हुल्लडबाजी किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे कृत्य आढळून आल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

या कारवाईमुळे शहरात कायद्याचा धाक निर्माण झाला असून नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत