अतुल फसाले यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवावी – पिंटू पाटील
नाझरे प्रतिनिधी
नाझरे पंचायत समिती गणामध्ये जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे, अभ्यासू व निर्भीड नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अतुल फसाले यांनी आगामी पंचायत समितीची निवडणूक लढवावी, अशी ठाम भूमिका सामाजिक कार्यकर्ते पिंटू पाटील यांनी मांडली आहे.
शेती, पाणी, शिक्षण आणि आरोग्य या ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांवर अतुल फसाले यांनी नेहमीच जनतेच्या बाजूने ठामपणे आवाज उठवला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी, पाणीटंचाई, शाळांच्या समस्या तसेच प्राथमिक आरोग्य सुविधांतील त्रुटींविरोधात त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे ते एक लोकाभिमुख आणि जबाबदार नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
पंचायत समितीत प्रामाणिक, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी अतुल फसाले यांच्यासारख्या नेतृत्वाची नितांत गरज असल्याचे पिंटू पाटील यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिक, युवक आणि शेतकरी वर्गामध्ये अतुल फसाले यांच्याबद्दल मोठा विश्वास असून त्यांनी निवडणूक रिंगणात उतरावे, अशी जनतेची अपेक्षा आहे.
परिवर्तन आणि सर्वांगीण विकासासाठी योग्य उमेदवार म्हणून अतुल फसाले यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहनही यावेळी पिंटू पाटील यांनी केले. नाझरे गणात या भूमिकेमुळे राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत