Breaking News

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जि .प .प्रा नाझरे शाळेची कु .ईश्वरी महेश रायचुरे तालुक्यात द्वितीय


 सांगोला प्रतिनिधी:

  पंचायत समिती शिक्षणविभाग सांगोला यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय व्यक्तिमत्व विकास स्पर्धेअंतर्गत वक्तृत्व स्पर्धेत जि.प.प्रा शाळा नाझरेची कु . ईश्वरी महेश रायचुरे इयत्ता ४थी हिने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावून   तिची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे . तिला तिच्या वर्गशिक्षिका श्रीम नयना पाटील मॅडम , श्रीम सुनिता विधाते मॅडम, श्रीम योगिता शांत मॅडम, श्रीम माधुरी जुंदळे मॅडम, श्री गंगाधर जुंदळे गुरुजी, श्री शिवाजी आडसूळ गुरुजी, श्री दादासाहेब बदडे गुरुजी तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री राजाराम कोळी गुरुजी यांचे मार्गदर्शन मिळाले . शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. ओंकार देशपांडे आणि उपाध्यक्ष श्री . सचिन वाघमारे तसेच नाझरे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री मल्लय्या मठपती साहेब आणि सांगोला तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री . सुयोग नवले साहेब यांनी यशस्वी विद्यार्थीनी व शाळेचे हार्दिक अभिनंदन केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत