Breaking News

सांगोला तहसीलदार संतोष कणसे यांना उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती


 

सांगोला प्रतिनिधी :

सांगोला तालुक्याचे कार्यक्षम, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख तहसीलदार म्हणून ओळख असलेले संतोष कणसे यांची उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाली आहे. राज्य शासनाच्या महसूल विभागाने २०२५-२६ या वर्षासाठी तहसीलदार संवर्गातील ११२ अधिकाऱ्यांची पदोन्नती जाहीर केली असून, त्यात सांगोल्याचे तहसीलदार कणसे यांचाही समावेश आहे. त्यांच्या या पदोन्नतीच्या बातमीने सांगोला तालुक्यात नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून तहसीलदार म्हणून सांगोला तालुक्यात कार्यरत असताना कणसे यांनी पारदर्शक प्रशासन, वेळेचे नियोजन आणि जनतेशी संवाद या त्रिसूत्रीच्या आधारे कामकाज चालवले. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, महसूल विषयक प्रश्न तसेच स्थानिक विकास कामांबाबत त्यांनी प्रशासन आणि जनतेत सामंजस्य व विश्वासाचे वातावरण निर्माण केले.

त्यांच्या कार्यकाळात सांगोला तहसील कार्यालयाने पारदर्शकतेचा आदर्श निर्माण केला. निवडणूक काळातील कामकाजात त्यांनी दाखवलेले शिस्तबद्ध नियोजन, अचूक अंमलबजावणी आणि तणावमुक्त कार्यपद्धती यामुळे सांगोला तहसील प्रशासनाचे कार्य राज्यभरात आदर्शवत ठरले.

संतोष कणसे यांनी "जनसेवा हेच कर्तव्य ” या तत्त्वावर आधारित काम करत प्रशासनाचा मानवी चेहरा जपला. त्यांच्या पदोन्नतीनंतर सांगोला तालुक्यातील सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्यांच्या या बढतीमुळे सांगोला तहसीलचे नाव राज्य प्रशासनात अधिक उंचावले असल्याची भावना व्यक्त होत आहे. कणसे यांचे प्रामाणिकता, समर्पण आणि कार्यतत्परता यामुळे ते सांगोल्याच्या जनतेच्या मनात कायम आदराने स्मरणात राहतील, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत