चंद्र, सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत बलवडी येथील सिद्धनाथ जन्माष्टमी सोहळा होणार..- आकाश पाटील महाराज
जगात चंद्र, सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत बलवडी ता. सांगोला येथील सिद्धनाथ जन्माष्टमी सोहळा होणार व मी येणारच याची ग्वाही देतो असे ह.भ.प. आकाश पाटील महाराज यांनी सिद्धनाथ मंदिर बलवडी येथे काल्याच्या कीर्तनात प्रसंगी सांगितले. तसेच पांडुरंग वारकरी शिक्षण संस्था धामणी ता. तासगाव या संस्थेचे साडेसात हजार स्केअर फुट बांधकाम झाले याचे मोठे श्रेय बलवडी वाल्यांचे आहे व त्यामुळे या गावास मी विसरू शकणार नाही, जीवात जीवमान असेपर्यंत सप्ताहस येऊ असेही पाटील महाराज यांनी सांगितले.
जीवनात प्रत्येकाने आई-वडिलांची सेवा करा त्यांना विसरू नका व मुलींनी बापाची काळजी घ्या व त्याचे कष्ट विचारात घेता संस्कारक्षम बना असा सल्लाही पाटील महाराज यांनी दिला. तसेच सकाळ व संध्याकाळी किमान दहा मिनिटे तरी नामस्मरण करा म्हणजे मोक्ष मिळेल असे किर्तन रुपी सेवेत सांगितले.
सप्ताहात नवनाथ ग्रंथ सामुदायिक वाचन सोहळा संपन्न झाला. व सुप्रियाताई बंडगर, हनुमंत पाटील महाराज, झावरे महाराज, माऊली महाराज, अर्पिता ताई अमराळे, गणेश महाराज, कैलास महाराज व आकाश पाटील महाराज यांचीही किर्तन रुपी सेवा संपन्न झाली. यावेळी सिद्धनाथ जन्माष्टमी कमिटी व ग्रामस्था तर्फे पाटील महाराज, देणगीदार व किर्तन सौजन्यदार यांचा भव्य ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत