नाझरे येथे वीरभद्र जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन...
नाझरे प्रतिनिधी
. नाझरे ता. सांगोला येथे वीरभद्र जयंती निमित्त मंदिरात शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर ते गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर अखेर परम रहस्य ग्रंथाचे पारायण, पहाटे पाच ते सहा श्रीस रुद्राभिषेक, सकाळी साडेनऊ ते साडे अकरा परम रहस्य ग्रंथाचे पारायण, दुपारी चार ते पाच वीरशैव व रंगनाथ भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी सहा ते सात शिवपाठ, व सायंकाळी साडेसात ते साडेआठ वेद.. वेदांताचार्य श्री श्री श्री 108 गुरु सिद्ध मनीकंठ शिवाचार्य महाराज यांचे प्रवचन, महाआरती व महाप्रसाद वाटप होईल.
शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा ते साडेसहा, षडाक्षरी मंत्राचा सामुदायिक जप, सकाळी साडेसहा ते सहा पंचेचाळीस श्री गुरु सिद्ध मनीकंठ शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वचन व सकाळी सहा वाजून 51 मिनिटांनी श्री स पुष्पवृष्टी होईल. त्यानंतर महाआरती व नाझरे गावातून श्री च्या पालखीची मिरवणूक निघणार आहे तरी या मंगल पर्वणीचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन समस्त वीरशैव समाज नाझरे, वझरे, कारंडेवाडी यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत