सांगोला पेन्शनर संघटनेतर्फे शिक्षणाधिकारी कादर शेख यांचा सत्कार संपन्न..
सांगोला प्रतिनिधी
सांगोला तालुका पेन्शनर संघटनेतर्फे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांचा पेन्शनर संघटनेचे सल्लागार शंकर सावंत व अध्यक्ष वसंतराव दिघे यांच्या शुभहस्ते गटशिक्षणाधिकारी कार्यालय सांगोला येथे करण्यात आला.
सदर प्रसंगी गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, नव्याने रुजू झालेले शिक्षण विस्तार अधिकारी असलम इनामदार, राऊत यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पेन्शनर संघटनेचे श्रीमंत वाघमारे, अर्जुन शिंदे, सौ. प्रतिभा शेंडे, अभिमन्यू कांबळे व सदस्य उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार वसंतराव दिघे यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत