Breaking News

अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळे – बालदिन उत्सव संपन्न


 प्रतिनिधी शशिकांत कोळी.

दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळे येथे *पंडित जवाहरलाल नेहरू* जयंतीनिमित्त ‘ *बालदिन* ’ उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी *बाल सभेचे* आयोजन करून संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रतिमेचे पूजन संस्थेचे संस्थाध्यक्ष मा. श्री. शिवाजी लाडे सर यांच्या हस्ते संपन्न झाले.

या विशेष प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची वेशभूषा परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच विद्यार्थ्यांनी नेहरूजींच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या बालप्रेमाचा सुंदर आढावा सादर केला.

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी *Abhinav colouring competition चे आयोजन* करण्यात आले होते. याशिवाय बालदिनानिमित्त दुपारच्या सत्रात मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करून वातावरण अधिक आनंदमय करण्यात आले.

सदरचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याबद्दल स्कूलचे संस्थाध्यक्ष व मुख्याध्यापिका, शिक्षक,  यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.

 अभिनव पब्लिक स्कूलतर्फे सर्वांना बालदिनाच्या शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत