सांगोला प्रतिनिधी:
जवळा येथिल रहिवासी आणि थोर समाज संघटक कै.जयाबाई दत्तु गुजले यांचे ४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता सुमारात निधन झाले आहे. गेल्या काही दिवसापासून या़ची प्रकृती ढासळली होती निधनासमयी त्यांचे वय ९०वर्षे इतके होते . त्यांच्या पश्चात मुले,मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक नेते आणि सीबीएस न्युज चे उपसंपादक राजाभाऊ गुजले याच्या त्या मातोश्री होत्या त्यांच्या जाण्यामुळे गुजले परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा अंत्यविधी ४ नोव्हेंबर सांयकाळी ७ वाजता सांगोला रोड वरील दत्त मंदिराच्या स्मशानभूमीत जवळा येथे अंत्यविधी पार पडला तसेच उद्या दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता तिसऱ्या दिवसाचा विधी पार पडणार असल्याचे माहिती गुजले कुटुंबांच्या वतीने देण्यात आली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत