भाजपा ओबीसी मोर्चा पुणे दक्षिण कार्यकारणी जाहीर.
विशेष प्रतिनिधी, संतोष कदम.
वालचंदनगर ,
भाजपा प्रदेश व जिल्हा अध्यक्ष निवडीनंतर ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत
भाजपा ओबीसीमोर्चा पुणे दक्षिन कार्यकारनी 2025 जाहीर करण्यात आली.
याबद्दल माहिती देताना भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मा.गजानन वाकसे यांनी सांगितले की
मा. रविंद्रजी चव्हाण साहेब, प्रदेश अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र.
मा. ना. चंद्रकांत दादा पाटील साहेब, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस , राजेशदादा पांडे साहेब यांच्या नेतृत्वात संघटन मजबूत करून पक्ष वाढीच्या
दृष्टिकोनातून जिल्हा समन्वयक मा. आमदार राहुलदादा कुल साहेब. जिल्हा अध्यक्ष मा. शेखरजी वढणे
साहेब यांच्या मान्यतेनुसार भाजपा ओ बी सी मोर्चा पुणे जिल्हा ग्रामीण (दक्षिण) विभागाची नुतन जिल्हा पदाधिकारी यांची यादी घोषित करण्यात येत आहे.
हा कार्यक्रम बारामती येथे राधाकृष्ण हाॅल मधे संपन्न झाला,यासाठी
मा.जिल्हाध्यक्ष मा.शेखरजी वढने यांच्या हस्ते अधिकृत यादी प्रकाशीत करताना
प्रदेश कार्यकारनी सदस्य मा.बाळासाहेब गावडे,नेते मा.नवनाथ पडळकर,मा.बाळासाहेब गरुड,मा.सचिन लंबाते,मा.आकाश कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या नवीन कार्यकारिणी मधे दौंड,बारामती,इंदापूर,भोर,
पुरंदर,खडक वासला यासह पुणे दक्षिण मधील जवळपास सर्व तालुक्यातील सक्रिय ओबीसी कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला असून पुढील काळात या कार्यकारिणीची व्याप्ती वाढू शकते असे वाकसे यांनी यावेळी सांगीतले.
कार्यक्रमा नंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत