Breaking News

महाराष्ट्र मोबाईल टावर तांत्रिक कामगार संघटनेच्या सोलापूर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न




सांगोला प्रतिनिधी –
संघटनेचे जिल्हाध्यक्ष तंत्रज्ञ हुसैन मुलाणी  यांनी सर्व सदस्यांना विचारात घेऊन संघटनेच्या कार्यप्रणालीत अधिक पारदर्शकता व कार्यक्षमतेसाठी आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. संघटनेच्या आर्थिक कामकाजाची जबाबदारी आता अनुभवी व तत्पर कार्यकर्ते  तंत्रज्ञ सुरज वाघमारे  यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आर्थिक शिस्तीबद्दल आणि संघटनेप्रती निष्ठेच्या बळावर ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, टेंभुर्णी परिसरातील सर्व कार्यकर्त्यांसाठी आनंदाची आणखी एक बातमी म्हणजे  तंत्रज्ञ रामदास घाडगे  यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. लोकांच्या अडचणींमध्ये सदैव पुढाकार घेणारे, संघटनेच्या प्रत्येक हाकेला तत्काळ प्रतिसाद देणारे आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले रामदास घाडगे यांना या पदामुळे आणखी मोठे नेतृत्व लाभले आहे.

याचबरोबर, कामगारांच्या हक्कांसाठी न्यायालयीन स्तरावर लढणारे, कामगार कायदे आणि त्यांच्या अधिकारांबाबत नेहमी मार्गदर्शन करणारे तंत्रज्ञ समाधान धांडोरे  यांचीही जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करत समाजकारण करणारे समाधान धांडोरे  हे संघटनेचे प्रभावी आवाज मानले जातात.
याप्रसंगी तंत्रज्ञ अफताब इनामदार, तंत्रज्ञ यशवंत जगधने, तंत्रज्ञ दत्तात्रय लोखंडे, तंत्रज्ञ भास्कर कुंभार,  तंत्रज्ञ अतुल पाटील, तंत्रज्ञ भरत कोळेकर, तंत्रज्ञ भोला गवळी, तंत्रज्ञ आबा कोळेकर, तंत्रज्ञ भिवाप्पा पडळकर, तंत्रज्ञ राजू बंडगर, तंत्रज्ञ योगेश लवटे, तंत्रज्ञ अमेय शिंदे,  इत्यादी मान्यवर उपस्थित होते

या तीनही नियुक्त्या संघटनेच्या भविष्यासाठी मोलाच्या ठरणार असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व नव्या पदाधिकाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत