वालचंदनगर पोलिसांची मोठी कारवाई : १०० किलो गांजासह आंतरराज्य टोळी जेरबंद एकूण २९ लाख ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त .
प्रतिनिधी –संतोष कदम
वालचंदनगर, ता. इंदापूर वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने पहाटेच्या सापळा कारवाईत १०० किलो गांजा आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ₹२९,९८,५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करत आंतरराज्य अंमली पदार्थ वाहतूक करणारी टोळी जेरबंद केली आहे.या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला आहे.वालचंदनगर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, बावडा-बारामती (बी.के.बी.एन.) रोडने एक होंडा सिटी (MH-12 DY-2012) गाडीमधून काही इसम गांजाची वाहतूक करीत आहेत. त्यानुसार सहा. पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली बावडा-बारामती रोडवर सापळा रचण्यात आला.या दरम्यान पोलिसांना संशयित गाडी कळंब गावाच्या हद्दीत दिसली. पोलिसांचा पाठलाग सुरू होताच चालकाने गाडी भरधाव वेगाने पळवली. पोलिसांनी सिनेमा-स्टाईल पाठलाग करत कळंब गावातील डी.पी. चौकात गाडी आडवून तीन इसमांना ताब्यात घेतले.गाडीची तपासणी करताना डिक्कीत प्लास्टिकच्या दोन पोत्यांमध्ये ९९.९४ किलो गांजा किंमत ₹२४,९८,५०० तसेच ₹५ लाखांचे चारचाकी वाहन असा एकूण ₹२९,९८,५०० किंमतीचा मुद्देमाल नायब तहसिलदार अविनाश डोईफोडे आणि शासकीय पंच यांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आला.अटक केलेल्या आरोपींची नावे अशी आहेत फिरोज अजिज बागवान (३६, रा. कसबा बारामती प्रदीप बाळासो गायकवाड (२८, रा. मळद, ता. बारामती मंगेश ज्ञानदेव राऊत (२९, रा. मळद, ता. बारामती)चौकशीत त्यांनी कबुली दिली की, ते हैद्राबादहून गांजा आणून विक्रीसाठी बारामती येथे घेऊन जात होते, तसेच त्यांच्या इतर तीन साथीदारांचा यात सहभाग असल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी पो ह वा गणेश काटकर यांच्या फिर्यादीवरून वालचंदनगर पोलीस ठाण्यात गु. र. नं. ३६३/२०२५ अन्वये अंमली पदार्थ प्रतिबंधक अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २०(क), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयाने १२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. तपासादरम्यान फरारी आरोपी अश्रम अजिज सय्यद (२९, रा. निरा वाघज) यासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या कारवाईत आंतरराज्य टोळीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,व गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुर्दशन राठोड, तसेच स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोहवा गणेश काटकर, उत्तम खाडे, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, किसन बेलदार, सचिन गायकवाड, शरद पोफळे, महेश पवार, अभिजीत कळसकर, गणेश वानकर, राहुल माने आणि ओंकार कांबळे यांनी सहभाग घेतला.वालचंदनगर पोलिसांच्या शिताफीच्या कारवाईमुळे अंमली पदार्थांचे मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत