Breaking News

नाझरे बंधारा असून अडचण नसून खोळंबा...

नाझरे प्रतिनिधी 

     नाझरे ता. सांगोला येथील मान नदीवरील बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाया जात असून, अद्याप दरवाजे न बसवल्याने व त्याची गळती सुरू असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्य य होत आहे व दरवाजे न टाकल्याने पाऊस पडून उपयोग काय असा प्रश्न शेतकरी वर्गात केला जात आहे. 

     नाझरे, वझरे, बलवडी या परिसरासाठी हा बंधारा बांधला खरा परंतु यंदा पाऊस भरपूर झाला व बंधाऱ्यात पाणी थांबेल असे शेतकरी वर्गांना वाटत होते परंतु आसपासच्या बंधाऱ्याचे दरवाजे टाकले परंतु नाझरे येथील दरवाजे न बसवल्याने व गळती न रोखल्याने पाणी दरवाजा मधून चिळकांड्या मारीत आहे तसेच संबंधिताचे याकडे अधिकच दुर्लक्ष झाल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे यास जबाबदार कोण व त्यामुळे बंधारा असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. 


     मागील वर्षात बंधाऱ्याची गळती बंद केली परंतु बंधाऱ्याच्या वरती म्हणजे पात्रात पाणी नाही व बंधाऱ्याच्या खाली पाणी होते त्यामुळे हा गळती बंधारा बांधला व अद्याप कित्येक वर्षे झाले तरी दुरुस्ती केली नाही ्यामुळे या बंधार्‍यात पाणी थांबत ही नाही व सध्या तर पहिलाच बंदरागळ की यातच दरवाजे न टाकल्याने व गळती न रोखल्याने बंधारा शेतकऱ्यांसाठी शाप की वरदान असे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. त्यामुळे ताबडतोब दरवाजे टाकून गळती बंद करा व बंधाऱ्याची दुरुस्ती करा अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत