Breaking News

अजनाळे येथील सुरेखा येलपले यांचे दुःखद निधन


 अजनाळे; 

अजनाळे येथिल सुरेखा दत्तात्रय येलपले यांचे बुधवार दिनांक १५ ऑक्टोंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.निधनासमयी त्यांचे वय ६२ वर्ष इतके होते. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, एक मुलगा, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. अजनाळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अर्जुन येलपले यांच्या त्या भावजय होत्या तर प्रवीण (भाऊ) येलपले  यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांचा स्वभाव शांत व मनमिळाऊ असा होता त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी  आज शुक्रवार दिनांक १७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७ वाजता अजनाळे येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत