सांगोला पुणे स्वारगेट बस चे नाझरे येथे स्वागत
नाझरे प्रतिनीधी:
सांगोला आगारातून सांगोला पुणे स्वारगेट ही बस सेवा आज पासून नाझरे आटपाडी दिघची मसवड गोंदवले दहिवडी फलटण मार्गे सुरू करण्यात आली असून तिचे नाझरे येथे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी सदर बसचे पूजन मा सरपंच विजयकुमार सरगर उपसरपंच विजय गोडसे यांचे हस्ते करण्यात आले या वेळी श्री ढोबळे, भारत शेळके, नंदकुमार रायचुरे, पांडुरंग वाघमारे, लक्ष्मण आलदर, सचिन वाघमारे, सिताराम यादव, गडहिरे, राजाराम रायचुरे, रामभाऊ घोडके, अहीन काझी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी या बसचे चालक श्री राहुल स्वामी, वाहक श्री दादासो नरळे व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री कुमार नरखडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून गाडी मार्गस्थ करण्यात आली सदरची बस सांगोला येथून सकाळी 8.30 वाजता निघत असून नाझरेतून 9.00 वाजता आटपाडी येथून 9.45 वाजता मसवड येथून 10.45 वा निघणार असून पुणे येथे दुपारी 3.00 वा पोहचणार असून या बसने प्रवास करण्याचे आवाहन सांगोला आगारा व्यवस्थापक श्री विकास पोपळे साहेब श्री कदम व पारसे यांनी केले आहे या बसला महिलाना व 65 वर्ष्यावरील प्रवाशांना अर्धे तिकीट अमृत ज्येष्ठ नागरिक यांना मोफत प्रवास या सर्व सवलती या बसला देण्यात आलेले आहेत तरी सर्वांनी या बसने प्रवास करून सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे ही सेवा सुरु करण्यासाठी प्रवाशी संघटनेचे कुमार नरखडे, तातोबा वाघमारे, पत्रकार संघटनेचे रविराज शेटे, वरकुटे येथील अल्प संख्याक सेलचे अध्यक्ष सद्दाम, शांताराम जाधव,पोपट धावड यांनी प्रयत्न केले असून ही बस सेवा सुरु करण्यासाठी जिल्हा वाहतूक अधिकारी श्री अजय पाटील सांगोला आगाराचे आगार व्यवस्थापक श्री विकास पोपळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत