लहुजी पॅंथर सेनेची महेश वाघमारे यांनी २० कुटुंबीयांची केली दिवाळी गोड.! अजनाळे येथील वझरे गावात स्वखर्चातून शिधावाटप.
सांगोला / तालुका प्रतिनिधी
सांगोला तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अहोरात्र संघर्ष करणारी संघटना जर कोणती संघटना असेल तर त्यात सर्वात अव्वल लहुजी पॅंथर संघटनेचे नाव येते.
सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शासन दरबारी तसेच प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी लहुजी पॅंथर सेना ही नेहमी तत्पर असते या संघटनेच्या स्थापनेपासून सर्वसामान्य जनतेचे हित जोपासणे हेच एकमेव ध्येय मनाशी बाळगून संघटनेची वाटचाल सुरू असताना सध्या स्थितीत अस्मानी संकटांमुळे शेतकरी व व्यापारी अडचणीत आले आहेत याची जाणीव ठेवून अजनाळे गणातील वझरे गावातील कुटुंबीयांच्या दिवाळीला एक हातभार लागावा व त्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने लहुजी पॅंथर संघटनेचे महेश वाघमारे यांनी काल सोमवार दि.२० रोजी गोरगरीब अशा २० कुटुंबांना स्वखर्चातून शिधावाटप केला.
यावेळी या गोरगरीब कुटुंबातील नागरिकांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून अत्यंत समाधान झाल्याचे वाघमारे यांनी यावेळी सांगितले तसेच यापुढील काळात देखील सर्वसामान्य जनतेचे हिताच्या प्रश्नासाठी व मदतीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहील अशी ग्वाही देखील लहुजी पॅंथर सेनेच्या महेश वाघमारे यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी मारुती वाघमारे, सुनील वाघमारे, गणेश वाघमारे, सुभाष कोकरे, दीपक शिंदे, उमेश चव्हाण, सागर दीक्षित, दत्ता सरगर यांच्यासह आजनाळे पंचायत समिती गणातील व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत