Breaking News

कोळा येथील समाज बांधवांनी दिलेली जबाबदारी पार पडली - एन डी एम.जे जिल्हाध्यक्ष पंकज कुमार काटे



सांगोला प्रतिनिधी

  कोळा  : गेली अनेक दिवसापासून कोळा येथील आंबेडकरी कार्यकर्त्यांची व समाज बांधवांची कोळा येथे असणाऱ्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिविहाराच्या स्मारकास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही बसवण्यात यावेत अशी मागणी होती ही मागणी कोळा येथील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली असता संघटनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत, पंचायत समितीचे गटविकासच अधिकारी  उपविभागीय दक्षता नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रांत या प्रशासकीय स्तरावर  वेळोवेळी पाठपुरावा करून ही मागणी मंजूर करून घेतली आणि सदर मागणीला चालू महिन्यात झालेल्या प्रात साहेबांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार गटविकास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत ही मागणी मंजूर करून घेतली आणि दहा दिवसाच्या आत या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोळा येथे सीसीटीव्हीचे काम पूर्ण झाले.


   
   इथून पुढच्याही काळात या तालुक्यांमध्ये या तालुक्याचे माजी आमदार एडवोकेट शहाजी बापू पाटील व एन डी एम जे राज्यसचिव वैभवजी गीते यांच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेचे पदाधिकारी समाधान धांडोरे  ,सचिन धांडोरे,  प्रज्योत काटे, जीवा सावंत, अजय चंदनशिवे, प्रदीप काटे, अमित मोरे, मंगेश काटे, विकास वाघमारे यांना सोबत घेऊन तालुक्यातील जनतेचे प्रश्न प्रशासनाच्या पटलावर मांडून हे प्रश्न मार्गी लावणार असे यावेळी जिल्हाध्यक्ष पंकज कुमार काटे यांनी सांगितले..

    या कामामुळे तालुक्यातील जनतेमधून संघटनेच्या कार्यकर्त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत