पायोनियर पब्लिक स्कूलमध्ये आनंदात साजरी दिवाळी
सांगोला गौरव न्यूज
पायोनियर पब्लिक स्कूलमध्ये दिवाळीचा सण पारंपरिक उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
या प्रसंगी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या पाच दिवसांचे महत्त्व समजावून सांगितले.
वसुबारस दिवसाचे महत्त्व मृणाल राऊत मॅडम यांनी सांगितले, लक्ष्मीपूजन दिनाविषयी जाधव मॅडम यांनी माहिती दिली, दिवाळी पाडवा याबद्दल रूपाली गायकवाड मॅडम यांनी सांगितले, तर भाऊबीज या सणाचे महत्त्व पूजा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
यावेळी शाळेचे संस्थापक श्री. अनिल येलपले सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या सर्जनशीलतेचे आणि उत्साहाचे कौतुक केले.
प्राचार्य सतीश देवमारे सर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. यानंतर विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील तयार करणे, पणत्या सजवणे, रांगोळी काढणे अशा सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दिवाळीच्या औचित्याने हाऊसवाइज किल्ला बनविणे ही स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साह, कल्पकता आणि टीमवर्कच्या जोरावर आकर्षक किल्ले साकारले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा येलपले मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन तनुजा मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमास शाळेचे संस्थापक श्री. अनिल येलपले सर, प्राचार्य श्री. सतीश देवमारे सर, तसेच अकॅडमिक इंचार्ज मृणाल राऊत मॅडम उपस्थित होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत