स्वर्गीय आबासाहेबांच्या बंगल्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे नाझरे गाव पूर्णपणे बंद व निषेध व्यक्त..
नाझरे प्रतिनिधी
स्वर्गीय आबासाहेबांच्या सांगोला येथील बंगल्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी नाझरे गाव पूर्णपणे बंद पाळण्यात आले.
यावेळी असे प्रसंग कोणावरही होऊ नये व याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी व दोषी व्यक्ती शासन करावे असे मा. सरपंच हनुमंत सरगर यांनी यावेळी सांगितले. तर या भ्याड हल्ल्याचा आम्ही नागरिक ग्रामस्थ निषेध करतो असे डॉक्टर विजय सरगर यांनी यावेळी सांगितले. तसेच व्यापारी बंधू व ग्रामस्थांचे आभारही मानण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत