Breaking News

सोमनाथ पोरे यांचा निरोप समारंभ तर सोनल सावंत यांचा स्वागत सत्कार समारंभ संपन्न....



 अजनाळे सचिन धांडोरे; जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनाळे (दिवाण मळा) येथिल शिक्षक सोमनाथ पोरे यांचा निरोप तर सोनल सावंत यांचा स्वागत-सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला.

शिक्षक सोमनाथ पोरे यांची बदली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बापू शिंदे वस्ती (हतिद) येथे झाल्याने त्यांचा निरोप घेण्यात आला. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी येथून नव्याने अजनाळे (दिवाण मळा) येथे नियुक्त झालेल्या सोनल सावंत यांचे स्वागत करण्यात आला.या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय येलपले, एकनाथ गुरव, मुरलीधर येलपले, भानुदास येलपले, अर्जुन येलपले, बाळासाहेब येलपले, शिवाजी येलपले, नामदेव येलपले, शंकर येलपले, हनुमंत लाडे, शरद कोळवले, नामदेव येड्रावकर, धोंडीराम लाडे, आगतराव भंडगे, धोंडीराम येलपले, डॉ. कोमल येलपले, चंद्रकांत येलपले यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी फक्कड लाडे व सुनिल लाडे,निलेश कोळवले(मामा) यांनी स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती.

भावनिक निरोप आणि आनंददायी स्वागताच्या या कार्यक्रमामुळे परिसरात आपुलकीचा व उत्साहाचा माहोल निर्माण झाला होता. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत