निखिल शिंदे यांची विक्रीकर निरीक्षक पदी निवड
सांगोला प्रतिनिधी
बलवडी ता. सांगोला येथील रहिवाशी व वाटंबरे ता. सांगोला येथे कार्यरत असलेले तलाठी निखिल मारुती शिंदे यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक मध्ये मेरिट लिस्ट मध्ये अठरावा क्रमांक आला आहे व त्यांची या पदावर निवड झाली आहे. सेवानिवृत्त शिक्षक मारुती शिंदे यांचे चिरंजीव आहेत.
शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण दहिवडी येथे तर माध्यमिक पुणे व उच्च माध्यमिक व्हीआयटी कॉलेज पुणे येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल तहसीलदार संतोष कणसे, नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे, सरपंच माऊली राऊत,बलवडी ग्रामस्थ व तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत