Breaking News

चिनके येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेचा उत्साहात शुभारंभ


 नाझरे प्रतिनिधी 

           चिनके ता. सांगोला येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली बुधवार १७ सप्टेंबर रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या शुभहस्ते अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमेश चंद्र कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच नाथा खंडागळे उपसरपंच मोहन मिसळ व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत योजना प्रभावी रित्या राबवावी तसेच जनहिताची व लोकोपयोगी कामे करावी असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे चिनके ग्रामपंचायत इकडून होत असलेल्या उपक्रमाबद्दल देखील आवर्जून कौतुक केले. यावेळी गटविकास अधिकारी उमेश चंद्र कुलकर्णी यांनी अभियानाची संपूर्ण सविस्तर माहिती दिली तसेच गाव स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी पंचायत समितीतील सर्व अधिकारी वर्ग घेऊन भेटी देणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. 

          कार्यक्रमाची प्रस्तावना उपसरपंच मोहन मिसाळ यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकर यांनी केले तर आभार प्रदर्शन व विशेष योजनांची माहिती विनायक मिसाळ यांनी दिली. यावेळी ग्रामविकास अधिकारी अण्णासाहेब भडंगे महसूल अधिकारी श्री बागमोडे अंगणवाडी प्रकल्प संचालक ,आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बंडगर गुरुजी हनुमंत पवार व सर्व ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष उमेश मिसाळ पोलीस पाटील पवार माजी सैनिक संघटनांचे सर्व पदाधिकारी बचत गटांचे प्रतिनिधी बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत