Breaking News

नाझरे गावात शिवार फेरी संपन्न


 

नाझरे प्रतिनिधी 

 महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या सेवा पंधरवड्यामध्ये तीन वेगवेगळ्या योजनांचा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात तालुक्यातील सर्व रस्त्यांचे संरक्षण करून त्यांचे अद्यावत यादी तयार केली जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून नाझरे तलाठी कार्यालय अंतर्गत नाझरे गावात शिवार फेरी करण्यात आले यामध्ये ग्रामीण भागातील रस्ते हद्दीचे ग्रामीण रस्ते ग्रामीण गाडी मार्ग पाय मार्ग शेतावर जाण्याचे उपाय मार्ग व रस्त्यांचे सीमांकन करणे अशांना भेटी देण्यात आल्या. यामध्ये नाजरे व सरगरवाडी गावात मिळून 37 रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले व त्यांची यादी तयार करण्यात आले सदरची यादी ही 17 सप्टेंबर रोजी ग्रामसभेमध्ये वाचून दाखवण्यात येणार आहे तसेच ग्रामसभेमध्ये सुचवलेल्या रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे तरी ग्रामसभेला उपस्थित राहून ग्रामस्थांनी आवश्यक त्या रस्त्यांचे नोंदी करावा असे आव्हान ग्राम महसूल अधिकारी जाधव व ग्रामविकास अधिकारी मंगेश कोरे यांनी केले. शिवार फेरीसाठी ग्राम महसूल अधिकारी जाधव,  ग्रामविकास अधिकारी मंगेश पोरे, पोलीस पाटील लक्ष्मण बनसोडे, मा. उपसरपंच गणी काझी, विजय सरगर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत