Breaking News

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा नाझरे गाव भेट दौरा संपन्न...


 नाझरे प्रतिनिधी 

           नाझरे गावातील रस्ते, स्मशानभूमी व इतर प्रश्नांची सोडवणूक करू तसेच नागरी परिसरातील सरगर वाडी, चौगुले मळा, बनसोडेवाडी व इतर नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करा अशा प्रशासनास सूचनाही यावेळी आमदार देशमुख यांनी दिल्या. यावेळी गावातील रस्ते व मशान भूमी यांची अवस्था बिकट असल्याचे नागरिकांनी सांगितले तर याची दखल घेऊ असे आश्वासन यावेळी दिले. 

        सदर प्रसंगी सोसायटी चेअरमन श्रीमंत सरगर, व्हॉइस चेअरमन गोरख भाऊ आदाटे, नूतन उपसरपंच ढोबळे यांचा आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जि प सदस्य दादाशेठ बाबर, बलवडी सोसायटी चेअरमन शिवाजी शिंदे, मा. उपसभापती सुनील चौगुले, शिक्षक नेते अशोक पाटील, मा. सरपंच शामराव वाघमारे, हनुमंत सरगर, संजय सरगर, डॉ. विजय सरगर, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सरगर, ग्राम. सदस्य प्रणाम चौगुले, शशिकांत पाटील, मधुकर आलदर, गणीसो काजी, मधुकर ढोबळे, रुबाब वाघमारे, डॉ. प्रशांत शिंदे, भारती शिंदे, ग्रामविकास अधिकारी मंगेश पोरे, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सोसा. मा. चेअरमन सुनील बनसोडे तर आभार ग्राम. सदस्य प्रा. विजय गोडसे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत