नाझरे प्रतिनिधी
डॉ. रमेश मोहिते यांनी नागरे प्राथमिक आरोग्य केंद्रात डोळे तपासणीचे काम 32 वर्षे केले व यामधून रुग्णांना दृष्टी मिळवून देण्याचे काम केले व आज सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी नाझरे ता. सांगोला येथे फी न घेता डोळे तपासणी कार्य सुरू केले म्हणजे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांनी मोहिते आय केअर उद्घाटन प्रसंगी नाजरे येथे मत व्यक्त केले.
डोळे म्हणजे जीवनाचा आत्मा आहे, दृष्टीशिवाय माणूस सांगा कसा बघू शकतो, डोळा हा अवयव नाही छोटा व जग दाखवण्यासाठी डोळ्याचा फार मोठा वाटा असतो असे सुरुवातीस सुरुवातीस सौ. योजना मोहिते यांनी सांगितले. यावेळी डॉ. सोमनाथ बोराटे, डॉ. पडवळे, डॉ. प्रशांत मोहिते, डॉ. रमेश मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी चे पूजन करण्यात आले व मोहिते आय केअर चे उद्घाटन डॉ. शिवाजीराव ढोबळे व डॉ. विजय सरगर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी ग्राम. सदस्य गणीसो काजी, शशिकांत पाटील, उद्योगपती महेश विभुते, सचिन मोरे, पत्रकार रविराज शेटे, डॉ. गौरी पाटील, डॉ. ज्योती पाटील, भारती भोसले, युवा नेते महेश वाघमारे, यश बनसोडे, पोलीस कर्मचारी जमीर शेख, डॉ. अमोल पाटील, बाळासो स्वामी, अंजली चंदनशिवे, डॉ. हर्षद मोहिते, डॉ. प्राजक्ता मोहिते, अमोल आईवळे, घनश्याम शिनगारे, पांडुरंग शिनगारे, विनायक शिनगारे, अब्बास भाई खाटीक, काशिलिंग कोळेकर, विक्रम पालसांडे, नागरिक, नातेवाईक, महिला, पुरुष रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व सर्वांचे आभार सौ. योजना मोहिते यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत