Breaking News

शिव - शंभू गणेशोत्सव मित्रमंडळ बसवनगर जेऊर गणेश मंडळाचे कार्य कौतुकास्पद - तुकाराम दुपारगुडे



विशेष प्रतिनिधी: रहमान आत्तार

सोलापूर:

मंडळाचे पदाधिकारी नो डीजे नो डॉल्बी आदेशाचे पालन करून सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब व माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार डीजे न लावता शिव- शंभो गणेशोत्सव मंडळ जेऊर तर्फे जेऊर येथील जिल्हा परिषद कन्नड शाळा, जिल्हा परिषद मराठी शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा व श्री काशीविश्वेश्वर हायस्कूल येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले व तसेच श्री काशी विश्वेश्वर हायस्कूल येथे 2024 - 25 वर्षा मधील स्वच्छ वर्ग या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ब या वर्गाला स्वच्छता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री महेश चांदकोठे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ननवरे सर, कन्नड शाळेचे मुख्याध्यापक वीरूपक्ष स्वामी सर ,मराठी शाळेचे मुख्याध्यापक सिद्धाराम जमादार सर, उर्दू शाळेचे रहीम शेख सर व सर्व शाळेतील सहशिक्षक, विद्यार्थी , मंडळाचे अध्यक्ष- लक्ष्मण कलमदाणे, अनिल सातपुते 

उपाध्यक्ष -- महा'तेश  सातपुते 

खजिनदार -- भागवत कदम 

सचिव - सचिन सातपुते , राजू शिंदे , बलभीम कलमदाणे, परशुराम कोळी ,शिवाजी सातपुते, रमेश सातपुते, पदाधिकारी व जेऊरचे पोलीस पाटील रहिमान अत्तार ,शिक्षणप्रेमी बसवराज बोरीकरजी आदी जन उपस्थित होते या उपक्रमातून श्री काशी विश्वेश्वर हायस्कूल येथे गरीब होतकरू 12 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व जिल्हा परिषद कन्नड शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप जिल्हा परिषद मराठी शाळेत एलईडी बल्ब वाटप जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये पाचशे लिटरची पाण्याची टाकी इत्यादी साहित्य देण्यात आले दिल्यानंतर शाळेच्या वतीने मंडळाचे कौतुक व मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे सत्कार करण्यात आले. हायस्कूल येथे श्री तुकाराम दुपारगुडे सर यांनी सूत्रसंचालन तर आभार श्री जमादार सर यांनी मानले व  जिल्हा परिषद मराठी शाळा येथे कोणतदे सर यांनी सूत्रसंचालन तर आभार आळगी सर यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत