Breaking News

तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पायोनियर गुरुकुल 18 सुवर्णपदकासह तालुक्यात अव्वल


  सांगोला गौरव न्यूज

        दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी क्रीडा संकुल सांगोला येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पायोनियर गुरुकुलच्या स्पर्धकांनी घवघवीत यश प्राप्त केले. ही स्पर्धा तीन वेगवेगळ्या वयोगटात पार पडली. त्या तिन्ही गटात पायोनियर गुरुकुलने उत्तुंग कामगिरी केली. 

        14 वर्षे वयोगटात मुलांमध्ये प्रणय बंडगरला गोल्ड मेडल तर अनिकेत गायकवाड व आर्यन कोळवले यास ब्रॉंझ मेडल मिळाले. 14 वर्षे वयोगट मुलींमध्ये अनुजा शिंदे, सई गडहिरे, रिया पवार, इशिका यलमर यांना गोल्ड मेडल मिळाले. दिव्या ढोले, शिवानी शिंदे व वेदिका चौगुले यांना सिल्व्हर मेडल मिळाले. वैष्णवी येलपले हिला ब्रॉंझ मेडल प्राप्त झाले. 

     17 वर्षीय वयोगटात मुलांमध्ये सूरज पुजारी, आदित्य बंडगर व पार्थ करमुडे यांना गोल्ड मेडल मिळाले. सूरज टकले, प्रथमेश आलदर व समर्थ सावंत यांनी सिल्व्हर मेडल मिळाले तर श्रवण शेजाळ व यश सूर्यवंशी यांनी ब्रॉंझ मेडल प्राप्त झाले. याच गटात मुलीमध्ये श्रावणी कंड्रे, अंबिका पाटील व सिमरन येलपले यांनी गोल्ड मेडल मिळवले. प्रतीक्षा आलदर, श्वेता सूर्यवंशी, निधीशा बाबर, वैष्णवी लवटे, श्रद्धा तंडे व स्वाती खंडागळे यांनी सिल्व्हर मेडल मिळवले. आर्या गायकवाड, धनश्री मंडले व मृणाली विभूते यांना ब्रॉंझ मेडल मिळाले. 

      19 वर्षीय गटात मुलींमध्ये कल्याणी जिरेकर, श्रवंतिका लिगाडे, भाग्यश्री पवार व ज्ञानेश्वरी घाडगे यांनी गोल्ड मेडल मिळवले. प्रणिती पवार, समता कुटे, रसिका खंडागळे व तनिष्का विभूते यांनी सिल्व्हरची प्राप्त केली तर सलोनी येलपले हिने ब्रॉंझ मेडल मिळवले.19 वर्षीय मुलांमध्ये अथर्व कोळवले,पीयूष कोळवले,सार्थक खंडागळे यांनी गोल्ड मेडल मिळवले. कुणाल पाटील याने सिल्वर मेडल मिळवले.

         या स्पर्धेत पायोनियर गुरुकुलने 18 गोल्ड, 16 सिल्व्हर, 10 ब्रॉंझ अशा एकूण 44 पदकांची कमाई केली व तालुक्यात सर्वाधिक पदके पटकवण्याचा मान मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांना पायोनियर गुरुकुलचे क्रीडा शिक्षक श्री. माळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. पायोनियर शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिल येलपले सर, पायोनियर गुरुकुल चे प्राचार्य डॉ अमोल रणदिवे सर, पायोनियर पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल सतीश देवमारे सर,सचिवा सौ. मनीषा येलपले मॅडम यांनी यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालकांकडून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत