Breaking News

नाझरे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी श्रीमंत सरगर तर व्हा. चेअरमन पदी गोरख भाऊ आदाटे यांची निवड


 नाझरे प्रतिनिधी 

        नाझरे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी शेकापचे श्रीमंत विठ्ठल सरगर तर व्हाईस चेअरमन पदी गोरख भाऊ जगन्नाथ आदाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

    या अगोदरचे चेअरमन सुनील बनसोडे व व्हाईस चेअरमन राजाभाऊ कोळेकर यांनी राजीनामा दिल्याने सदर जागेवर त्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी मा. चेअरमन सुनील बनसोडे, व्हॉइस चेअरमन राजाभाऊ कोळेकर, नूतन चेअरमन श्रीमंत सरगर व नूतन व्हाईस चेअरमन गोरख भाऊ आदाटे यांचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी मा. उपसभापती सुनील चौगुले, शिक्षक नेते अशोक पाटील, मा. सरपंच हनुमंत सरगर, संजय सरगर, डॉक्टर विजय सरगर, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सरगर, ग्राम. सदस्य मधुकर आलदर, शशिकांत पाटील, दामोदर आलदर, राजू खोकले, अप्पू राज आदाटे, सुनील आडसूळ, सुभाष आदाटे, पोपट काजी, शिवाजी निंबाळकर, बाळासो वाघमारे, सचिव तुकाराम कुंभार, मच्छिंद्र सरगर, सर्व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत