नाझरे येथील अण्णा आदाटे यांचे निधन..
नाझरे प्रतिनिधी
नाझरे ता. सांगोला येथील अण्णा भिवा आधाटे यांचे बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्षे 90 होते. मा. उपसरपंच बसवेश्वर आदाटे यांचे ते वडील होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता नाझरे येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत