Breaking News

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत पायोनियर गुरुकुल व इंग्लिश मिडीयम स्कूलचे दमदार यश


 सांगोला गौरव न्यूज

   दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी क्रीडा संकुल सांगोला येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत पायोनियर निवासी गुरुकुल च्या स्पर्धकांनी घवघवीत यश प्राप्त केले ही स्पर्धा निरनिराळ्या क्रीडा प्रकारात व निरनिराळ्या वयोगटात पार पडली. सर्व क्रीडा प्रकारात पायोनियर गुरुकुलने दमदार  कामगिरी केली.

      14 वर्षे वयोगटात लांब उडी या प्रकारात शुभम संभाजी लाडे यांनी प्रथम क्रमांक व आयुष संजय पाटील यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. थाळी फेक मध्ये संकल्प छगन येलपले यांनी प्रथम तर आदित्य दत्तात्रय येलपले यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच गोळा फेक या प्रकारात आदित्य दत्तात्रय येलपले यांनी प्रथम क्रमांक व संकल्प छगन येलपले यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. रिले 4 × 100 मीटर या सांघिक खेळात आयुष संजय पाटील, आर्यन दत्तात्रय लाडे,शुभम संभाजी लाडे,मयुरेश समाधान खंडागळे व विराज तानाजी गुराडे यांनी दमदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. 200 मीटर धावणे या प्रकारात आयुष संजय पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर 80 मीटर हर्डल मध्ये शुभम संभाजी लाडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

        17 वर्ष वयोगटात 5 कि.मी.चालणे या प्रकारात श्रवण पांडुरंग शेजाळ यांनी प्रथम क्रमांक व श्रेयस वैभव येलपले यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. 400 मीटर हर्डल मध्ये ओम शंकर चौगुले यांनी तृतीय क्रमांक पटकावला. 110 मीटर हर्डल या प्रकारात संस्कार कृष्णदेव कोडग व यश समाधान सूर्यवंशी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तिहेरी उडी मध्ये अथर्व राजकुमार कोळवले याने प्रथम क्रमांक तर श्रवण पांडुरंग शेजाळ याने द्वितीय क्रमांक पटकावला.200 मीटर धावणे या प्रकारात अथर्व राजकुमार कोळवले यांनी तृतीय क्रमांक पटकावला. बांबू उडी मध्ये मंथन सुशांत बेंद्रे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.4 × 400 मीटर रिले या सांघिक प्रकारात अथर्व राजकुमार कोळवले,सुरज धनाजी पुजारी,सार्थक समाधान खंडागळे,गणेश विजय गंगधर,ओम शंकर चौगुले यांनी दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.

       19 वर्ष वयोगटात 5 कि.मी.चालणे जीवन मारुती मेखले द्वितीय व हर्षद शिवाजी अनुसे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. बांबू उडी या प्रकारात हर्षद शिवाजी अनुसे यांनी प्रथम क्रमांक व पियुष चंद्रकांत कोळवले यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

           या स्पर्धेत पायोनियर निवासी गुरुकुलच्या 18 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक राज माळी सर व नितीन घाडगे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पायोनियर शैक्षणिक संकुलाचे संस्थाध्यक्ष मा.अनिल येलपले सर,पायोनियर गुरुकुलचे प्राचार्य डॉ.अमोल रणदिवे सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी य.मंगेवाडी गावचे माजी सरपंच दत्तात्रय मासाळ,छगन येलपले,दत्तात्रय येलपले,सोमनाथ आदलिंगे सर, समाधान येलपले सर आदी मान्यवर उपस्थित होते. मैदानी क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी करत पायोनियर गुरुकुलने आपल्या यशाची घोडदौड कायम राखली आहे.मिळालेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून शिक्षक व खेळाडू यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत