जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पायोनियर गुरुकुलच्या प्रणिती पवारचे सुयश
सांगोला गौरव न्यूज
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला यांच्या वतीने गुरुवर्य कै. बापूसाहेब झपके यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शालेय व महाविद्यालयीन स्तरासाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील इयत्ता आठवी ते दहावी या गटात पायोनियर निवासी गुरुकुलची विद्यार्थीनी कु. प्रणिती राजेंद्र पवार हिने प्रथम क्रमांक पटकावला.
'कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके - आधारवड' या विषयावर तिने भाषण केले. बापूसाहेबांच्या जीवनातील अनेक पैलू तिने तिच्या भाषणात उलगडले. उत्तुंग आवाज, अचूकता, भाषेवर असणारे प्रभुत्व आणि श्रोत्यांना खिळवण्याची क्षमता या उपजत गुणांच्या बळावर प्रणितीने जिल्हास्तरीय स्पर्धेचा चषक आपल्या नावे केला.
तिला पायोनियर निवासी गुरुकुलचे प्राचार्य डॉ.अमोल रणदिवे सर, संस्थेचे संस्थाध्यक्ष श्री.अनिल येलपले सर तसेच तिच्या या वक्तृत्वाचे बाळकडू तिला जिच्याकडून मिळाले ती म्हणजे तिची आई सौ.सीमा राजेंद्र पवार या सर्वांचे तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. निरनिराळ्या भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्यातील सुप्त कलागुणांना व त्यांच्या कौशल्यांना वाव देऊन त्यांचा नावलौकिक वाढवणारी एक अग्रगण्य संस्था म्हणून पायोनियर निवासी गुरुकुल कार्यरत आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत