Breaking News

नाझरे येथे शक्तीपीठ जमीन मोजणीस शेतकऱ्यांचा विरोध...


 नाझरे प्रतिनिधी 

           शक्तिपीठ महामार्ग हा रत्नागिरी नागपूर नाझरे येथून चार किलोमीटर महामार्गाला समांतर असून या महामार्गाची कुणीही मागणी केलेली नाही व बागायती शेतीवर घाला घालून शेकडो शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे व यामुळे आम्ही शक्तीपीठात जमीन देणार नाही व महामार्ग मोजणी विरोध आहे यामुळे आम्ही शक्तिपीठास,लिखित नकार दर्शविला आहे असे सांगत नाझरे ता. सांगोला येथील शेतकऱ्यांनी मोजणीस विरोध केला आहे त्यामुळे मोजणी अधिकारी यांनी पंचनामा करून निवेदन घेतले. 

       या अगोदर बलवडी, वझरे येथील शेतकऱ्यांनी जमीन मोजणी विरोध केला व त्याप्रमाणे नाझरे येथेही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विरोध केला व शक्तीपीठ महामार्ग संदर्भात आपण लवकरच सर्व शेतकऱ्यांची सांगोला येथे बैठक घेऊन या पुढील दिशा ठरवण्यासाठी व नियोजनासाठी शेतकऱ्यांनी आतापर्यंत दाखवलेली एकजूट यापुढेही दाखवावी व बैठकीस हजर राहावे असे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन देशमुख यांनी यावेळी सांगितले. तर शक्तिपीठ महामार्गातून कोल्हापूर जिल्ह्यास ज्याप्रमाणे वगळले त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यास वगळावे व शासनाने पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे संघर्ष समितीचे उपाध्यक्ष दादासो वाघमोडे यांनी यावेळी सांगितले. 

  


  सदर प्रसंगी बाधित शेतकरी डॉक्टर हरिश्चंद्र सोनवणे, महालिंग पाटील, दत्तात्रय देशपांडे, सचिन बनसोडे, दीपक शिरदाळे, गुरुलिंग पाटील, विजय शिरदाळे, संजय बनसोडे, सदानंद शिरदाळे, तुकाराम कुंभार, हरिश्चंद्र बनसोडे, संतोष गोडसे, अल्लम प्रभू पाटील, चंद्रकांत बनसोडे, संजय भंडारे, हनुमंत बनसोडे, देविदास शिरदळे, पांडुरंग बनसोडे, कुमार जोंधळे, संतोष बनसोडे, शिवाजी भंडारे, उल्हास स्वामी, संतोष स्वामी, महादेव बनसोडे, शिवाजी गडदे, सतीश बनसोडे, अमोल बनसोडे, विजयकुमार जोंधळे, बसवेश्वर जोंधळे, राजू पाटील इ. शेतकरी, मोजणी अधिकारी, पोलीस पाटील, तलाठी, कृषी सहाय्यक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत