Breaking News

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कोळा विद्यामंदिरचे घवघवीत यश


 

सांगोला प्रतिनिधी 

        शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी सांगोला तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा क्रीडा संकुल येथे पार पडल्या. या स्पर्धांमध्ये कोळा विद्यामंदिरच्या खेळाडूंनी कुस्ती प्रकारात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

१४ वर्षांखालील वयोगट – फ्री स्टाईल कुस्ती:

अक्षयकुमार सावंता नरळे (४८ किलो वजनी गट) – प्रथम क्रमांक

१९ वर्षांखालील वयोगट – ग्रीको-रोमन कुस्ती:

करण संजय आलदर (५५ किलो वजनी गट) – प्रथम क्रमांक

रिहान वजीर तांबोळी (६० किलो वजनी गट) – प्रथम क्रमांक

आर्यन नारायण उत्तराजी (७० किलोपेक्षा जास्त वजनी गट) – प्रथम क्रमांक

    वरील सर्व विद्यार्थ्यांनी प्रभावी कौशल्य दाखवत आपापल्या वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या यशामागे प्रा. अंकुश सरगर, मारुती सरगर आणि विजय पांढरे सर यांचे कुशल मार्गदर्शन लाभले.

     मुख्याध्यापक लांडगे सर व पर्यवेक्षक जगताप सर यांनी या यशस्वी खेळाडूंनी दिलेल्या कामगिरीचे मनःपूर्वक कौतुक केले.

     या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव मा. मल्लिकार्जुन घोंगडे सर, खजिनदार मा. शंकरराव सावंत सर, सहसचिव मा. प्रशूद्धचंद्र झपके साहेब, संस्था सदस्य मा. विश्वेशजी झपके, प्राचार्य लांडगे सर, पर्यवेक्षक जगताप सर, तसेच सर्व अध्यापकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत