पायोनियर गुरुकुलचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत उत्तुंग यश
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा सांगोला येथील क्रीडा संकुलात पार पडल्या. या स्पर्धेत पायोनियर गुरुकुलच्या स्पर्धकांनी चमकदार कामगिरी केली.
१७ वर्षीय वयोगटात फ्रीस्टाईल प्रकारात सूरज धनंजय टकले याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. सार्थक समाधान खंडागळे याने १७ वर्षीय वयोगटात फ्रीस्टाईल प्रकारात तृतीय क्रमांक तर मिळवलाच पण ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याची जिल्हास्तरीय ग्रीको रोमन कुस्ती प्रकारासाठी निवड झाली आहे.
या स्पर्धकांना निवासी गुरुकुलचे क्रीडा शिक्षक राज माळी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक श्री. अनिल येलपले, निवासी गुरुकुलचे प्राचार्य डॉ.अमोल रणदिवे सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील अशा स्पर्धकांना व त्यांच्या कौशल्यांना सातत्याने वाव देऊन त्यांचा नावलौकिक वाढवणारी संस्था म्हणून पायोनियरकडे पाहिले जाते. गुरुकुलच्या या यशाबद्दल पालकामधून व ग्रामस्थांमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत