बलवडी गावच्या नूतन तंटामुक्ती अध्यक्षपदी साहेबराव शिंदे यांची बिनविरोध निवड
नाझरे प्रतिनिधी
बलवडी ता. सांगोला येथील नूतन तंटामुक्ती अध्यक्ष पदी साहेबराव उद्धव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी बाळासो कारंडे यांची निवड झाली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली राऊत हे होते. निवडीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार मा. सरपंच विजय दादा शिंदे, बाळासो शिंदे, सरपंच माऊली राऊत व उपसरपंच रविराज शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
सदर प्रसंगी मा. तंटामुक्ती अध्यक्ष मोहन भाऊ शिंदे, प्रसाद शिंदे,ग्राम. सदस्य समाधान शिंदे, बाबासोपालसांडे, सुरेश गुरव, शिवाजी शिंदे, विकास पवार, महादेव शिंदे, बाबुराव पवार, काकासो शिंदे, सर्जेराव मोहिते, अण्णा सो मोहिते, आप्पा पवार, सचिन गायकवाड, दत्तात्रय निंबाळकर, संजय करडे, समाधान करडे, गोपीनाथ शिंदे, धनाजी पाटील, गणेश बाबर, सिद्धेश्वर शिंदे, ग्रामसेवक राजकुमार ताटे, पोलीस पाटील श्रीकांत तोरणे, ग्रामस्थ, नागरिक उपस्थित होते. सर्वांना बरोबर घेऊन काम करू अशी निवडीनंतर नूतन अध्यक्ष साहेबराव शिंदे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत