प्रा. गणेश पैलवान यांचे सेट परीक्षेत सुयश
सांगोला प्रतिनिधी
सांगोला महाविद्यालया संगणक शास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक श्री गणेश अरुण पैलवान हे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या *सहाय्यक प्राध्यापक* पदासाठीच्या *सेट* पात्रता परीक्षेत *कॉम्प्युटर सायन्स अँड एप्लीकेशन* या विषयातुन पात्र झाले आहेत.त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगोला येथील जिल्हा परिषद शाळा नंबर तीन ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यू.कॉलेज सांगोला , महाविद्यालयीन शिक्षण सांगोला महाविद्यालय सांगोला तर पदव्युत्तर शिक्षण हे सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट,कमलापूर या ठिकाणी झाले सदर यशापर्यंत पोहचण्यासाठी त्यांना चुलते कै. देविदास पैलवान(गुरुजी),प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके सर व संगणक शास्त्र विषयातील तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. सदर यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड ,उपाध्यक्ष प्रा.झपके सर,केदार साहेब, सचिव उदयबापू घोंगडे व सर्व संस्था पदाधिकारी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश भोसले व सर्व सहकारी प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत