भक्ती आणि नामस्मरणाच्या जोरावर दिव्यप्राप्ती मिळते...- गुरुवर्य भालचंद्र पाटील काका
सांगोला प्रतिनिधी
भक्ती आणि नामस्मरणाच्या जोरावर दिव्य कृपा व दिव्य प्राप्ती मिळते व यासाठी गुरुचरित्रातील गुरुआज्ञेचे आचरण करणे ही काळाची गरज आहे असे मोराळे पेड ता. तासगाव येथील श्री नरसिंह सरस्वती दत्त महाराज या देवस्थानचे गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी वारणानगर येथील शारदा वाचन मंदिर आणि तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वर्षा व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुरुचरित्रातून गुरूआज्ञा या विषयावर वारणानगर येथे वर्षा व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफले.
मानवी जीवनात सुख, शांती, समाधान मिळवायचे असेल तर अध्यात्माकडे लक्ष देणे गरजेचे आहे व आपल्या अवतीभोवती काही अदृश्य शक्ती वास करीत असतात याचा अभ्यास करा व त्याचे अवलोकन करा. तसेच जीवन सुखी, समृद्ध होण्यासाठी मध्यपान व मांसाहार करू नका व गुरुचरित्राचा अभ्यास करून जीवनात सुख मिळवा व यासाठी नामस्मरण व अध्यात्माची गरज आहे.
आंधळी भक्ती न करता अंतकरणापासून निष्ठा ठेवून देवाची भक्ती करा व मनातील अहंकार, द्वेष दूर करून ग्रंथ वाचन करा कारण ग्रंथाशिवाय ज्ञान मिळत नाही व यासाठी गुरुचरित्राचा अभ्यास करा असेही गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी गुरुचरित्रातून गुरुआज्ञा या विषयावर वारणानगर येथे वर्षा व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना प्रबोधनात सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत