Breaking News

पायोनियर स्कूल य.मंगेवाडी येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी


 सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

     पायोनियर इंग्लिश मिडीयम स्कूल य.मंगेवाडी येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व दलितांना त्यांच्या साहित्यातून प्रेरणा देणारे  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती पायोनियर स्कूल मध्ये उत्साहात पार पडली.या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल येलपले सर, निवासी गुरुकुलचे प्रिन्सिपल डॉक्टर अमोल रणदिवे सर व सर्व H.O.D.आशुतोष रुपनर सर, संदिप बाबर सर, वैशाली येलपले मॅडम व बबिता राऊत मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

     कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन करून करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप बाबर सर यांनी करुन विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांच्या कार्याचे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे महत्त्व पताऊन दिले. तसेच सहशिक्षक म्हेत्रे मॅडम व मोहन वाघमारे सर यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या कार्याचे वर्णन केले. लोकमान्य टिळकांचे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या वाक्याचे महत्त्व सांगितले. तसेच अण्णाभाऊ साठे यांची दीड दिवसांच्या शाळेच्या शिक्षणावर खूप साहित्य लेखन केले. गरिबी आणि भेदभाव यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही असे सांगितले.

त्यानंतर गुरुकुलचे प्रिन्सिपल अमोल रणदिवे सर यांनी लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती देऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे कौतुक केले. ते आपल्या राज्याच्या बाहेर असताना गायलेले गीत माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतीय कायली.या गाण्याचा अर्थ समजावून सांगितला.

तसेच संस्थाध्यक्ष अनिल येलपले सर यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांच्या कार्याचे कौतुक केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील गरिब आणि उपेक्षित लोकांसाठी आपले आयुष्य समर्पित केले.त्यांनी कथा ,कादंबऱ्या , गाणी आणि नाटके लिहिली. त्यांनी दलीत गरीब आणि शोषितांच्या व्यथा आपल्या लेखनातून मांडल्या हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

त्यानंतर आभारप्रदर्शन मगर मॅडम यांनी करुन कार्यक्रमाचा शेवट केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत