Breaking News

श्री विठ्ठल मल्टीस्टेट चे चेअरमन दीपक बंदरे महाराष्ट्र बिजनेस अवार्डने सन्मानित.... मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची विशेष उपस्थिती..


सांगोला प्रतिनिधी 

          सांगोला येथील श्री विठ्ठल मल्टीस्टेट चे चेअरमन दीपक बंदरे यांना महाराष्ट्र बिजनेस अवॉर्डने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. 

     रिसेल इन यांच्या सौजन्याने दिला जाणारा हा पुरस्कार सोहळा नाशिक येथे संपन्न झाला. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी, डेप्युटी कमिशनर जी. एस. टी. समाधान महाजन, सकाळ मीडिया ग्रुपचे नाशिकचे विक्रांत मते, हेमंत राठी चेअरमन राम बंधू मसाले यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार बंदरेंना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात 25 शाखेद्वारे श्री विठ्ठल मल्टीस्टेट ही संस्था कार्यरत असून, या सेवेचा गौरव म्हणून चेअरमन दीपक बंदरे यांना महाराष्ट्र बिजनेस अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी विठ्ठल परिवाराचे अधिकारी, कर्मचारी, सभासद, हितचिंतक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत