Breaking News

जि प प्रा मराठी शाळा जत्तीवस्ती संख येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..! शाळेच्या वाटचालीबाबत व होत असलेल्या उपक्रमाबद्दल पालकांकडून शेटे सरांचा सत्कार संपन्न


सांगोला प्रतिनिधी 

        सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा! या उक्तीप्रमाणेच भारत देशातील विविधता व त्यातून जोपासली जाणारी एकता अतिशय वाखाणण्याजोगी आहे. याच भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर शूरवीरांनी व क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता बलिदान दिले व देशाला इंग्रजांच्या दीडशे वर्ष गुलामगिरीतून आझाद केले. यामुळे 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभरात जल्लोषात साजरा केला जातो त्याचप्रमाणे जत्तीवस्ती शाळेतही स्वातंत्र्य दिन अगदी धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. प्रथमतः महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.  

          क्रांतिकारकांविषयी माहिती व देश प्रेमाची भावना जागृत होण्यासाठी स्वातंत्र्यलढ्याचे थोडक्यात वर्णन मुख्याध्यापक शेटे सर यांनी विद्यार्थ्यांपुढे केले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनीही देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थित पालकांचे लक्ष वेधून घेतले. तसेच चंद्रशेखर ठोंबरे, श्रीकांत जत्ती, समृद्धी जत्ती, अवनी राठोड, शितल तुराई, हर्षदा ठोंबरे, प्रतीक्षा ठोंबरे, स्नेहा ठोंबरे, भाग्यश्री जत्ती, अभिजीत तुराई, अंकिता ठोंबरे या बालचमुंनी भाषण व देशभक्तीपर नृत्यातून उपस्थित पालकांचे मन जिंकून घेतले. झेंडावंदन झाल्यानंतर प्रथम शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांप्रमाणे देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली. अगदी कमी कालावधीत अगदी उत्तमरीत्या सादरीकरण केल्याबद्दल व यासाठी मार्गदर्शनाबद्दल मुख्याध्यापक शेटे सर व सहशिक्षिका बसर्गी मॅडम यांचे पालकांनी अभिनंदन केले. तसेच मागील एक वर्षापासून शाळेची होत असलेली वाटचाल व गुणवत्तेतील सुधारणा व पट वाढीसाठी केलेले विशेष प्रयत्न व त्यातून आलेले यश या सर्व उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शेटे सर यांचा सर्व पालक वर्गाने एकत्रित येऊन सत्कार केला. या अचानक केलेल्या सत्कारामुळे शेटे सर भारावून गेले व नक्कीच या सत्कारामुळे काम करण्याची प्रेरणा व नवी उमेद मिळाल्याचे त्यांनी याप्रसंगी मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रावसाहेब जत्ती, शाळेच्या सहशिक्षिका प्रियंका बसर्गी,अंगणवाडी सेविका कांबळे मॅडम मदतनीस रेखा जाधव ,ज्येष्ठ नागरिक नामदेव जाधव, विठ्ठल बागेळी, रुद्राप्पा गडदे, दत्ता जाधव, पालक अण्णासाहेब जत्ती, आप्पासाहेब जत्ती, संतोष जत्ती, यशवंत वाघोली, मारुती ठोंबरे, अंकुश ठोंबरे, सावळा ठोंबरे महेश अवरादी, पोपट व्हटकर, बापू पुंदे, रमेश बागेळी, सिद्राय जत्ती, हनुमंत जत्ती इ. नागरिक उपस्थित होते. यापुढेही शाळेसाठी कोणतीही मदत  लागल्यास नेहमी हजर असू व मुख्याध्यापक शेटे सर यांना नेहमी साथ देऊ असे सर्व पालक वर्गाने आवर्जून सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत