स्व. आमदार गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अनकढाळ येथील शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व खाऊ वाटप संपन्न...
नाझरे प्रतिनिधी
ग्रीनिज बुकात नोंद झालेले व सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आमदार गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्याचा विकास केला व त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त अनकढाळ शाळा नंबर एक, शाळा नंबर दोन व माळेवाडी, अहिल्यानगर ता. सांगोला येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.
सदर प्रसंगी पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बंडगर, ग्राम. सदस्य अधिक बंडगर, प्रगतशील बागायतदार राजेंद्र नानासो बंडगर, युवा नेते बापू बंडगर, गणेश सरगर, राजू सुखदेव बंडगर, संतोष सरगर, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार प्रकाश बंडगर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत