चोपडी व पाचेगाव येथील मोजणी थांबवली..! जमीनीचे संपादन रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी...
नाझरे प्रतिनिधी
पाचेगाव, चोपडी येथील शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा विरोध असून येथील जमीन संपादित करू नये अशी मागणी झाल्याने भूमी अभिलेख पथकास मोजणी न करता माघारी परतावे लागले.
शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी, बोरवेल, पाईपलाईन, विहिरी जाणार असल्याने तरी शेतकरी वर्ग मुकणार आहे मग त्यांनी खायचे काय असा प्रश्न शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड सचिन देशमुख यांनी यावेळी केला, तर येथून चार ते पाच किलोमीटर अंतरावर पर्याय मार्ग असताना या शक्तिपीठ महामार्गाची गरज काय आहे व जुन्या महामार्गास हा मार्ग जोडावा व सरकारने अजून शहाणे व्हावे असा सवाल संघर्ष समितीचे उपाध्यक्ष शरद यादव यांनी केला. तर आमच्यावर सरकारने अन्याय करू नये असे शेतकरी वर्गाने ठणकावून सांगितले.
सदर प्रसंगी शेतकरी प्रकाश पडळकर, ज्ञानेश्वर पडळकर, संभाजी बिले, शरद यादव, प्रवीण चौगुले, वसंत याद व, विकास यादव, अभिजीत चौगुले, भीमराव चौगुले, उत्तम चौगुले व शेतकरी बांधव उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत