नाझरे येथील श्रावण मासानिमित्त निघणाऱ्या शिव दिंडीचा डॉक्टर धारेश्वर महास्वामींच्या हस्ते सांगता समारंभ संपन्न...
नाझरे प्रतिनिधी
माणसाचा जन्म मिळावा असे वाटत असेल तर प्रत्येकाने शिव दिंडीत सामील होणे गरजेचे आहे तसेच विना घेणाऱ्याचा रस्ता बरोबर असतो व ज्या घरात तेथे नादब्रह्म असतो. ज्या घरात टाळ वाजतो त्या घरातील दुःख दारिद्र्य नष्ट होते. व प्रसाद सागर महाप्रसादाने दिंडी सार्थ ठरते व श्रावण महिन्यात दिंडीच्या रूपाने नाझरे येथील शिवमय वातावरण निर्माण झाले असे राष्ट्रसंत डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी यांनी श्रावण मासानिमित्त निघणाऱ्या शिव दिंडीचा सांगता समारंभ प्रसंगी आशीर्वाचनात सांगितले. तसेच शिवाची भक्ती करा म्हणजे मुक्ती मिळेल असेही सांगितले.
सदर प्रसंगी ओंकार प्रधान रूप गणेशाचे, गुरुराज माऊली, माऊली माऊली गुरुराज माऊली, गुरु देवा फार उशीर केला तुमच्यासाठी जीव वेडा झाला, ओम श्रीराम जय राम जय जय राम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, राधाकृष्ण राधा, धारेश्वर महास्वामीजी की जय, हर हर महादेव या घोषणेने व भक्ती गीताने शिव दिंडीचा सांगता समारंभ संपन्न झाला. यावेळी असंख्य शिवभक्त उपस्थित होते. शेवटी महाप्रसाद वाटप करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत