Breaking News

नाझरे व परिसरात डीजे मुक्त गणेशोत्सव शांततेत साजरा करा - पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे


 नाझरे प्रतिनिधी 

         नाझरे व परिसरात येत्या 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे व हा सण उत्साहात, शांततेत साजरा करा परंतु डीजे चा वापर न करता पारंपारिक वाद्याचा वापर करा व पोलीस प्रशासना सहकार्य करा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे यांनी नाझरे ता. सांगोला येथील शांतता समितीच्या बैठकीत केले. 

      पोलिस आयुक्त व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव साजरा करताना कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत व मंडळांनी स्वयंसेवक तथा ग्राम सुरक्षा दल नेमून गणपती उत्सव शांततेत साजरा करा तसेच गौरी गणपती हा महिलांचा उत्सव आहे त्यामुळे महिलांच्या बाबतीत तक्रार येता कामा नये याची जबाबदारी मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे व ही मीटिंग आगमनासाठी आहे यानंतर विसर्जनासाठी ही बैठक आयोजित करणार आहोत परंतु डीजे, डॉल्बी बंद करून गणेश उत्सव आनंदाने व उत्साहाने साजरा करा असेही पो.नि. रूपाली उबाळे यांनी यावेळी केले. सुरुवातीस पोलीस हवालदार सुजित जाधव यांनी गणेश मंडळाने जे उपक्रम राबविणार त्याची यादी पोलीस स्टेशनला द्या असे सांगितले. तर साडेनऊच्या पुढचे कार्यकर्ते प्रत्येक मंडळांने आवरावेत असे पोलीस हवलदार अनिल बनसोडे यांनी यावेळी सांगितले. नाझरे व परिसरात आतापर्यंत शांततेत उत्सव साजरे झाले आहेत परंतु इतर सण उत्सवात सुद्धा डॉल्बीचा वापर करू नये असे नागरिकात बोलले जात आहे. सदर प्रसंगी गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत