Breaking News

पायोनियर गुरुकुल य.मंगेवाडी येथे महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी उत्साहात साजरी


  

  अजनाळे : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राजकीय व अराजकीय अशा दोन्ही भूमिकांनी लढा देणारे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व दलितांना त्यांच्या साहित्यातून प्रेरणा देणारे विद्रोही विचारवंत व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पायोनियर निवासी गुरुकुल य.मंगेवाडी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. 

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक श्री.अनिल येलपले सर होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्राप्त लोकशाहीर जयवंत रणदिवे हे होते. संस्थेच्या सचिवा सौ.मनीषा येलपले व यलमार मंगेवाडी गावचे माजी सरपंच दत्तात्रय मासाळ हेही कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुलींच्या निवासी गुरुकुलच्या विभाग प्रमुख सौ. ज्योती रणदिवे मॅडम यांनी गीत गायन करून अण्णाभाऊ साठे यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री जयवंत रणदिवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या शाहिरी व पोवाड्यातून उपस्थितांची वाहवा मिळवली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट त्यांनी त्यांच्या पूर्ण कार्यक्रमातून उलगडून सांगितला. त्यानंतर निवासी गुरुकुलचे प्राचार्य डॉ.अमोल रणदिवे सर यांनीही पोवाडा सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

      इयत्ता नववीचा विद्यार्थी मंथन बेंद्रे याने 'माझी मैना गावावर ऱ्हायली' ही अण्णाभाऊ साठेंची छक्कड सादर केली. इयत्ता आठवीचे विद्यार्थी यश गुराडे, आदित्य खटके, श्रेयश पाटील तसेच दहावीच्या विद्यार्थीनी प्रणिती पवार व रिद्धी विटेकर यांनी टिळकांच्या त्यागाबद्दल व त्यांच्या योगदानाबद्दल माहिती सांगितली.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित रणदिवे सर यांनी केले व आभार समाधान सातपुते सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत