अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी
अजनाळे: अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळे येथे दिनांक १ ऑगस्ट रोजी थोर राष्ट्रनेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात, अभिमानाने व श्रद्धेने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही थोर विभूतींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. हे पूजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. शिवाजी लाडे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर रसिका मॅडम यांनी लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रहितासाठीचे कार्य, विचारसरणी व ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या प्रभावी विचारावर आधारित माहिती दिली. त्यांच्या भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत झाली.
त्यानंतर कोळी सर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य, त्यांचा संघर्ष आणि सामाजिक संदेश देणारे साहित्य यावर प्रकाश टाकला. अण्णाभाऊंच्या कार्यातून समाजातील वंचित व उपेक्षित घटकांना मिळालेला नवा आत्मविश्वास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सीमा मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शाळेतील सर्व शिक्षकांनी एकत्रितपणे केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत