जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनाळे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी
अजनाळे: सचिन धांडोरे:
साहित्यरत्न लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार ज्योती मोरे-धांडोरे मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या वेळी मुख्याध्यापक एकनाथ गुरव गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कादंबऱ्या, कविता आणि लोककथांमधून समाजातील अन्याय, विषमता आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवला. वंचित, गरीब आणि श्रमिक वर्गाच्या वेदना त्यांनी वास्तववादी शैलीत मांडल्या. तर लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी नेते होते. त्यांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” ही घोषणा देऊन जनतेत स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली. शिक्षण, समाजसुधारणा आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंतीसारखे सार्वजनिक कार्यक्रम सुरू केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शितल गुरव यांनी मानले या कार्यक्रमाला विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत