लिंगायत समाजातील सर्व पोट जातीचे विटा येथे रविवारी मोफत वधू-वर मेळाव्याचे आयोजन...- अच्युत दुगमे
सांगोला प्रतिनिधी
लिंगायत समाजातील सर्व जाती, पोट जाती यामध्ये जंगम, स्वामी, वाणी, तेली, माळी व इतर 70 जाती व तीनशे पोट जातीमधील सर्व समाजातील पोट जातीसाठी स्वातंत्र्यसैनिक पार्वती विश्वनाथ लकडे सभागृह मन्मथ मंदिर महादेव गल्ली विटा जि. सांगली येथे मोफत वधू-वर मेळाव्याचे रविवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आयोजन केले असल्याचे आयोजक अच्युत दुगमे यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी शिवालिंगायत समाज संस्थापक अध्यक्ष दयानंद पाटील हे राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री सौ. स्मिता आद्य प्रभू उपस्थित राहणार आहे.
सदर मेळावा मोफत असून यासाठी विजयकुमार ठिगळे मोबा. 8484016 176, महादेव लोखंडे मामा मोबा. 9860 388687, शिवकुमार करोशी मोबा. 90 35220612, सौ. शांता दुगमे मोबा. 9130 769308, नंदकुमार सोलापूरे मोबा. 99 22811929, अशोक सुकटे मोबा. 84591 74644 व रविराज शेटे मोबा. 94210 22815 या नंबर वर नाव नोंदणी करावी व बायोडेटा पाठवावा. तसेच मेळाव्यासाठी वधू वर उपस्थित राहणे बंधनकारक आहे, तरी सदर मेळाव्याचा लिंगायत समाजातील सर्व पोटजातींनी लाभ घ्यावा असे आवाहन सौ. शांता दुगमे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत