तालुकास्तरीय समूहनृत्य स्पर्धेत य.मंगेवाडीच्या पायोनियर शैक्षणिक संकुलाचे घवघवीत यश
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब सांगोला व इनरव्हील क्लब सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहनृत्य स्पर्धेत पायोनियर शैक्षणिक संकुलाने घवघवीत यश संपादन केले.
स्पर्धेचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला या ठिकाणी केले गेले होते. या स्पर्धा तीन गटामध्ये घेण्यात आल्या होत्या. सर्वच गटामध्ये पायोनियरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. इयत्ता १ली ते ४थीच्या लहान गटामध्ये पायोनियरच्या भगतसिंग थीमवर आधारित चिमुकल्यांच्या सादरीकरणास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. इयत्ता ५वी ते ७वी या गटामध्ये ऑपरेशन सिंदूर या थीमवर विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. त्याही सादरीकरणास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. इयत्ता ८वी ते १०वी या गटात पायोनियरच्या विद्यार्थ्यांनी शहीद जवान या थीमवर नृत्य सादर केले. हे नृत्य पूर्ण स्पर्धेतील सर्वात लक्षवेधी असे सादरीकरण ठरले. विद्यार्थ्यांचे हावभाव व अभिनय इतका जिवंत होता की प्रेक्षकांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. या नृत्य सादरीकरणास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
विद्यार्थ्यांच्या या यशात पायोनियर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्षअनिल येलपले सर, पायोनियर निवासी गुरुकुलचे प्राचार्य डॉ.अमोल रणदिवे सर,अकॅडमीक इन्चार्ज सोमनाथ आदलिंगे सर, सांस्कृतिक प्रमुख ज्योती रणदिवे मॅडम, राज माळी सर, य.मंगेवाडी गावचे माजी सरपंच दत्तात्रय मासाळ तसेच सर्व विद्यार्थी,शिक्षक व कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.मिळालेल्या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत